पावसाळा आला म्हटलं की वातावरणात बदल होतो. हवेत ओलावा व दमटपणा येतो. याच वातावरणाचा परिणाम स्वयंपाक घरातील वस्तूवर होतो. आणि पावसाळ्यात किचन मधील वस्तू लगेच खराब होतात. या वस्तू लवकर खराब होऊ नयेत म्हणून आज मी काही सोप्या टिप्स सांगणार आहे.
पावसाळ्यात उपयोगी पडतील अशा टिप्स:
१) पावसाळा चालू झाला म्हटलं की लगेच मीठ ओले होते. मीठ ओले होऊ नये म्हणून मिठाच्या बरणीमध्ये थोडेसे तांदूळ कापडामध्ये बांधून ठेवावे. म्हणजे ते तांदूळ मिठाचा ओलावा शोषून घेतील.
२) हवेच्या दमटपणामुळे पावसाळ्यात पीठ लवकर खराब होते. पीठ खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये तेज पत्ता ठेवू शकता.
३) मटकी ,चवळी ,हरभरे यासारख्या कडधान्यांना कीड लागू नये म्हणून थोडेसे तेल लावून पॅक बंद डब्यामध्ये ठेवल्याने कीड लागत नाही.
४) पावसाळ्यात रव्याला लगेच अळी लागते. रव्यामध्ये अळी जाळी होऊ नये म्हणून रवा गॅसवर मंद आचेवर गरम करून पॅक बंद डब्यात ठेवावा.
५) पावसाळ्यात काडीपेटी पेट घेत नाही. त्यासाठी काडीपेटी ही पॅकबंद डब्यात ठेवावी.
६) पावसाळ्यात घरात माशा होतात, आणि किचनमध्ये सुद्धा दमटपणामुळे खराब वास येतो. त्यासाठी कापराच्या काही वड्या किचनमध्ये ठेवाव्यात. आणि फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये कापूर टाकावा.
७) पावसाळ्यात कपड्यांचा वास येऊ नये म्हणून कपडे कम्फर्ट मध्ये घालून नंतरच सुकवावे म्हणजे कपड्यांचा फ्रेशनेसपणा टिकून राहील.
८) बिस्किटे, स्नॅक्स यासारखे पदार्थ पॅकबंद डब्यामध्ये ठेवावे.
९) साखरेमध्ये मुंग्या होऊ नयेत म्हणून साखरेत लवंगा टाकून ठेवाव्यात.
१०) ड्रायफूट चे डबे हे फ्रिजमध्ये ठेवावेत. त्यामुळे ड्रायफूट लवकर खराब होणार नाहीत.
ही माहिती नक्कीच पावसाळ्यात उपयोगी पडणारी आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा