केस गळती थांबविण्यासाठी घरगुती उपाय| Home remedies of hair fall.


                आज-काल केस गळतीची समस्या सर्वांना जाणवत आहे. ताणतणावाची जीवनशैली, वाढते प्रदूषण, पोषणतत्वांची कमतरता, खाण्यापिण्यातील बदल यासारख्या अनेक कारणांनी केस गळती चालू होते. केस गळणे आणि त्या जागी नवीन केस येणे ही सामान्य बाब असते. परंतु त्या गळलेल्या केसांच्या जागी जेव्हा नवीन केस उगवले जात नाही आणि तिथे टक्कल दिसू लागले की केस गळतीची समस्या गंभीर वाटू लागते.

                  केस गळतीची समस्या आपल्या सौंदर्यात बाधा आणू शकते. जेव्हा जास्त केस गळू लागतात तेव्हा केस गळतीच्या समस्येवर कोणते उपाय करता येऊ शकतात, केस गळती कशी थांबवली जाऊ शकते यासारखे प्रश्न पडतात. आजच्या लेखात आपण केस गळती थांबविण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

केस गळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय|hair fall remedies:


१) खोबरेल तेल-: आठवड्यातून किमान दोन वेळा तरी आपण खोबरेल तेलाने मसाज केला पाहिजे. खोबरेल तेलाने केस गळती कमी होते आणि केस मऊ आणि मजबूत बनतात. मसाज केल्याने त्वचेचे रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होऊन केसांची ग्रोथ वाढते.

) मेथीच्या बिया- मेथीच्या बिया वाटून तिची पेस्ट जर केसांना लावली तर केस गळती रोखली जाऊ शकते. किंवा मेथीच्या बिया खोबरेल तेलामध्ये टाकून त्या तेलाने मालिश केल्याने केस गळती थांबते. तसेच तुम्ही मेथीच्या भाजीचा आपल्या आहारात समावेश करायला हवा.


) कोरफड- कोरफडीचा गर काढून केसांना लावल्यास केस गळणे थांबते तसेच केसांची वाढ होते. केस मुलायम आणि मजबूत होतात.


) आवळा - आवळा पावडरची पेस्ट करून केसांना लावली तर केस गळती कमी होते. आवळा खोबरेल तेलात गरम करून ते तेल केसांना लावल्यास केस गळणे थांबते.आणि केसांची वाढ चांगली होते. केसांना मेहंदी लावताना मेहंदीमध्ये आवळा पावडर मिक्स करून हे तुम्ही केसांना लावू शकता.


५) मेहंदी - केसांना ही पोषण तत्वांची गरज असते. त्यासाठी आपण नॅचरल मेहंदी केसांना लावू शकता. मेहंदी मुळे केस गळती थांबते व केसांची वाढ चांगली होते. मेहंदी मुळे केस चमकदार आणि मजबूत होतात.

 ६) कांद्याचा रस - कांद्याचा रस काढून जर केसांच्या मुळांना लावला तर केस गळती कमी होते.

                  केस गळती रोखण्यासाठी वरील उपाय आहेतच. परंतु आपण आपल्या आहारात कोणत्या घटकांचा समावेश करतो ज्यामुळे केसांना आवश्यक असणारे पोषणद्रव्ये भेटतील याचाही विचार करायला हवा. केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी केसांची व्यवस्थित निगा राखली पाहिजे. नियमितपणे ऑइल मसाज, केस धुणे, रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा कमी वापर करणे, सकस आहार घेणे यामुळे आपण आपल्या केसांची छान काळजी घेऊ शकतो.

            

टिप्पण्या