आषाढी एकादशी 2023|व्रत/उपवास कसा करावा?|How to fast ashadi ekadashi.

       मराठी वर्षा नुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षांमध्ये येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीच्या उपवासाला खूप महत्त्व आहे. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे.

आषाढी एकादशी चे महत्व :

           आषाढी एकादशी दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे.या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो तो कार्तिकी एकादशीला संपतो. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान विष्णू हे, क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेस जातात. आणि कार्तिकी एकादशीला योगनिद्रेतून बाहेर येतात.



   आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा?

                खरंतर, एकादशीच्या दिवशी काहीही खाऊ नये. परंतु प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असते. मग ज्याला जसे झोपेल तसा अल्पहार घ्यावा. शक्यतो साबुदाणा खिचडी, तेलकट, तळलेले पदार्थ, तूपकट खाऊ नये.

                 उपवासा दिवशी फळे खावीत,दूध प्यावे, सुकामेवा आणि शरीराला पोषण देणारे उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी चालतील. उपवासाच्या दिवशी हरी किर्तन, भजन कसे घडेल याचा विचार करावा कारण उपवासाचा खरा अर्थ म्हणजे देवाचाच वास.

एकादशी दिवशी देवतांचे पूजन कसे करावे?   

                 एकादशी दिवशी सकाळी लवकर उठावे. आंघोळ करून घर स्वच्छ करावे. घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे. घरातील सर्व देवतांची पूजा करावी. भगवान श्रीविष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करून भगवानांना पिवळे वस्त्र अर्पण करावे. फुले, तिलक, तुलसी पत्र, पंचामृत, आरती, अगरबत्ती इत्यादी. साहित्यांनी मनोभावी पूजा करावी. आषाढी एकादशी व्रताची कथा ऐकावी व नंतर आरती करावी. या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने योगनिद्रेत जातात असे म्हटले जाते.

                  एकादशी दिवशी विठू माऊलींची मनोभावे पूजा करावी. माऊलींची प्रतिमा किंवा मूर्ती असेल तर अभिषेक करून मनोभावे पूजा करावी.

   

देवशयनी एकादशी 2023 तिथि आणि मुहूर्त :

एकादशी तिथि आरंभ 29 जून सकाळी 3 वाजून 17 मिनिटांनी सुरू.

एकादशी तिथी समाप्त 30 जून सकाळी 2 वाजून 42 पर्यंत.      

      आषाढी एकादशीचा उपवास 29 जून रोजी पकडावा. आणि 30 जूनला सोडावा.


टिप्पण्या