आषाढी एकादशीची माहिती|ashadi ekadashi information in Marathi.
मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षांमध्ये येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात.
आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. पूर्ण वर्षांमध्ये एकूण १४ एकादशी येतात. पण त्यातील आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी यांना खूप महत्त्व असते. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असे म्हटले जाते. त्यामुळेच हे आषाढी एकादशीचे व्रत खूप भक्तिभावाने केले जाते. आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठोबाचे दर्शन घेण्यासाठी वारीत सहभागी होतात.
आषाढी एकादशी (ashadhi ekadashi) महत्व :
१. आषाढी एकादशी मध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते.
२. आषाढी एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे.
३. आषाढी एकादशीचे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात.
आषाढी एकादशी: ( पंढरपूरची वारी )
आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. महाराष्ट्रात फार वर्षापासून चालत आलेली ही वारीची परंपरा फार लोकप्रिय आहे. वारकरी शेकडो किलोमीटर चालत भक्ती भावाने विठ्ठल नामाचा जयघोष करून आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक संतांचा वारसा आपल्याला लाभला आहे. या एकादशीसाठी आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, देहूतून संत तुकाराम, त्र्यंबकेश्वर मधून संत निवृत्तीनाथ, सासवड मधून सोपान देवांची, पैठण मधून संत एकनाथांची, मेहून मधून संत मुक्ताबाईंची, तेरहून संत गोरा कुंभाराची अशा अनेक पालख्या पंढरपूरला विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला निघते. ती आषाढ शुक्ल दशमीला रात्री पंढरपूरला पोहोचते. या पालख्यांबरोबर असंख्य वारकरी दिंडीतून पायी चालत, मोठ्या श्रद्धेने, भक्ती भावाने पंढरपूरला जातात.
इ.स. १२९१ मध्ये आषाढी एकादशीला आळंदीहून पंढरपूरला जाण्यासाठी पहिली दिंडी निघाली होती असे म्हटले जाते. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध टिळा आणि तोंडी विठू नामाचा गजर करत, खांद्यावर पताका, हातात टाळ, डोईवर तुळस घेऊन वारकरी दिंडीत सहभागी होतात.
ही जर आषाढी एकादशीची माहिती( ashadhi ekadashi information in Marathi) जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा