त्वचेची काळजी घेणाऱ्या काही उपयुक्त टिप्स| glowing skin of beauty tips




       सुंदर आणि नितळ त्वचा कोणाला नको असते? सुंदर लोकांना पाहताच आपल्याला असे वाटते की आपली त्वचा अशी का नाही? आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच भेटत नाही. त्यामुळे आपल्या त्वचेकडे आपले दुर्लक्ष होते. आपला चेहरा सुंदर उठावदार बनवण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी मी तुमच्यासाठी या लेखात काही अतिशय सोपे व घरगुती उपाय सांगणार आहे.  

         त्वचेची काळजी घेणाऱ्या काही उपयुक्त टिप्स खालील प्रमाणे .

   १) सकाळी चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याऐवजी थंड                   पाण्याचा वापर करावा. थंड पाण्याने चेहरा अगदी                    टवटवीत दिसेल.

    २) आठवड्यातून एकदा बेसन, हळद आणि दूध एकत्र                करून त्याचा फेस पॅक बनवून लावू शकता. मध आणि            दही एकत्र करून त्याचा मसाज चेहऱ्याला दिल्यास                त्वचेची डेड स्किन निघून जाते.


     ३) आपल्या बागेत कोरफड तर असतेच. त्या कोरफडीचा              गर काढून त्याने चेहऱ्यावर मसाज करा. जर घरी                    कोरफड नसेल तरी तुम्ही बाजारात भेटणाऱ्या एलोवेरा            जेलचा वापर करू शकता. कोरफडी मुळे त्वचा अगदी            मऊ आणि ग्लोइंग दिसते.            


 ४) सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या आहारात            काय खातो? हेल्दी त्वचेसाठी हेल्दी खाने हे खूप आवश्यक असते. नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी आपण फळे, हिरव्या पालेभाज्या खाव्यात भरपूर प्रमाणात पाणी पिणे या गोष्टीचा समावेश करावा.



५) आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी महत्त्वाची भूमिका डोळे बजावतात त्यासाठी डोळे सुंदर दिसणे खूप महत्त्वाचे आहे डोळ्यांच्या आली येणारे  काळी वर्तुळे घालण्यासाठी तुम्ही काकडीचा काप  डोळ्यावरती ठेवू शकता.

६) आपण जो दिवसभर चेहऱ्यावरती मेकअप करतो तो रात्री झोपताना काढून नंतरच झोपावे.

तुम्हाला हा लेख  आवडला असेल तर तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, तसेच माझ्या ए टू झेड इन्फॉर्मेशन या फेसबुक पेजला लाईक करा ,फॉलो करा.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा