प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते की आपले केस सुंदर, काळे, घनदाट असावेत. व्यक्तीचे सौंदर्य वाढवण्यामध्ये केसांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. परंतु आजच्या या धावपळीच्या, प्रदूषणाच्या आणि अतिरिक्त ताण यामुळे केसांच्या खूप समस्या निर्माण झाल्या आहेत. खरंतर केसांची काळजी ही आपण नेहमीच सगळ्याच ऋतूंमध्ये घेतली पाहिजे. पण आज मी तुम्हाला पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी व निगा कशी राखावी याबद्दल काही टिप्स सांगणार आहे.
पावसाळ्यात केसांची घ्यावयाची काळजी/टिप्स
१) पावसाळ्यात केस ओले होणार नाहीत याची मुख्यता काळजी घेतली पाहिजे. हवेत असणारे धुलीकण पावसाच्या पाण्याबरोबर केसावर येतात. ज्यामुळे केस कुमकुवत आणि निर्जीव होतात.
२) आठवड्यातून दोनदा केस धुवावे. जर पावसामुळे केस ओले झाले असतील तर कोमट पाण्याने केस धुवावेत. केस धुण्यासाठी केमिकल नसणारे शाम्पू वापरावेत.
३) केसांना किमान आठवड्यातून दोन वेळा तरी खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल कोमट करून लावावे. नंतर केस धुवावेत.
४) तुम्ही घरच्या घरी हेअर मास्क बनवून लावू शकता. आवळा, रिठा, शिकेकाईचा वापर कंडिशनर म्हणून करू शकता.
५) केस मोकळे ठेवा. बांधायचे असतील तर हलक्या रबर बँड चा वापर करा.
६) केस नैसर्गिक रित्या सुकवा. केस सुकविण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करणे, हेअर स्ट्रेटनिंग करणे किंवा आयर्निंग करणे टाळावे.
७) केस विंचरण्यासाठी मोठ्या दातांच्या कंगव्यांचा वापर करावा. तसेच केस हळुवारपणे विंचरावेत.
८) पावसाळ्यात केसांच्या पोषणासाठी आवश्यक असणारा विटामिन E युक्त आहार घ्यावा. आहारात कडधान्य, प्रोटीन युक्त घटकांचा समावेश करावा.
मी सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल
आणि पावसाळ्यातही तुम्ही तुमच्या केसांची छान अशी निगा राखू शकाल.

Chan
उत्तर द्याहटवा