तुपाचे फायदे|benefits of Ghee.

 


                '  तूप खाल्लं की रूप येत. ' अशी फार पूर्वीपासून चालत आलेली म्हण आहे. आपली भारतीय संस्कृती आणि आयुर्वेद यामध्ये तुपाला फार महत्त्व आहे. तुपाशिवाय स्वयंपाक घर अशी कल्पनाच होऊ शकत नाही. आपल्या रोजच्या आहारामध्ये किमान २ चमचे तुपाचा समावेश केला पाहिजे. तुपाचे नियमित सेवन केल्याने आरोग्य सुधारते. तुपाच्या सेवनामुळे केस सुंदर व चमकदार होतात. त्वचा सुंदर होते. बऱ्याच जणांचा असा समज आहे की, तूप खाल्ल्याने वजन वाढते. पण असे अजिबात नाही योग्य प्रमाणात तूप खाल्ले तर आपल्याला तुपाचे फायदेच होतात. तर आजच्या लेखात आपण बघणार आहोत तूप खाण्याचे फायदे.

तूप खाण्याचे फायदे(benefits of Ghee):

१) त्वचेसाठी उपयुक्त: तुपामध्ये ओमेगा- ३, फॅटी ॲसिड, ब्युटीरिक ॲसिड, विटामिन ए, विटामिन बी १२, विटामिन डी. के सारखे पोषक घटक असतात. जी त्वचेसाठी खूप उपयुक्त असतात. तुपाच्या सेवनामुळे त्वचा तजेलदार होते आणि त्वचेला चमक येते.

२) इम्युनिटी पावर वाढवते- तुपामध्ये असणाऱ्या ओमेगा ३, ओमेगा ९, फॅटी असिड व जीवनसत्व ए, के इत्यादीमुळे आपली इम्युनिटी पावर वाढते. जर आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची असेल तर दररोज आहारात दोन चमचे तुपाचा समावेश केला गेला पाहिजे.

३) लो कोलेस्ट्रॉल- तुपाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तुपात ब्युटीरीक असिड असते जे आतड्यांना मजबूत करण्याचे काम करते आणि कोलेस्ट्रॉल कमी करते.

४) गरोदरपणात तुपाचे फायदे- गरोदर मातांच्या हेल्दी खाण्याकडे खूप लक्ष दिले जाते. गरोदरपणात तुपाचे सेवन खूप फायदेशीर ठरते. तुपामध्ये खूप पोषक तत्वे असतात. याचा गरोदर मातांना खूप फायदा होतो.

५) हाडे मजबूत बनतात- सांधेदुखी आणि हाडांच्या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी तुपाचा समावेश आहारात करावा. विटामिन डी आणि विटामिन के याचे जास्त प्रमाण तुपात असल्याने हाडे मजबूत होतात.

६) पचनक्रिया सुधारते- तुपामध्ये ब्युटीरिक असिड असते. त्यामुळे आतड्यातील उतींचे पोषण होते आणि दाह कमी होऊन पचनक्रिया सुधारते.

७) डोळ्यांसाठी उपयुक्त- तुपामध्ये विटामिन ए अधिक प्रमाणात असते. विटामिन ए हे डोळे व त्वचेसाठी खूप महत्त्वाचे असते. तुपाचे नियमित सेवन केल्याने शरीराला विटामिन ए मिळते. जे डोळ्यांसाठी खूप उपयुक्त असते.

         असे हे तूप आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते. त्यामुळेच आपल्या दररोजच्या आहारामध्ये तुपाचे सेवन हे केलेच पाहिजे. आपल्या आपल्या शरीराबरोबरच आपले सौंदर्य खुलवण्यासाठी सुद्धा तुपाचा खूप उपयोग होतो.

टिप्पण्या