पावसाळ्यात पायांना होणाऱ्या चिखल्यांसाठी उपाय

              


                     पावसाळा सुरू झाला म्हटलं की सर्वात पहिली समस्या उदभवते, ती म्हणजे पायांना चिखली उठते. पावसाळ्यात आपले पाय नेहमीच पाण्याच्या संपर्कात येतात. पावसाचे दूषित पाणी आणि चिखल यामुळे पायांच्या बोटांमध्ये खाज सुटू लागते व नंतर तेथे जखमा होऊ लागतात. यालाच पायांना चिखल्या पडणे असे म्हणतात. कधी कधी तर या जखमांमधून रक्त येऊ लागते आणि आपल्याला चालणे अशक्य होऊन जाते.

पायांना पडणाऱ्या चिखल्या/जखमा कशा बऱ्या कराव्यात यावरती काय उपाय आहेत हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

चिखल्या बऱ्या करण्यासाठी उपाय खालील प्रमाणे:

१) पाय गरम पाण्याने स्वच्छ धुणे- पावसाळ्यात नेहमी बाहेरून आले की, पहिल्यांदा गरम पाण्याने पाय स्वच्छ धुऊन घ्यावेत व चांगले कोरडे पाय करावेत. यामुळे पायावरील जंतू नाहीसे होऊन चिखल्या होण्यास प्रतिबंध होतो.

२) पायांना कडूलिंबाचे तेल किंवा एरंडेल तेल लावणे- कडुलिंबाचे तेल आणि एरंडेल तेल यामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात. जे पायांना पडलेल्या चिखल्या बरे करण्यास उपयुक्त असतात. पाय गरम पाण्याने स्वच्छ धुऊन टॉवेलने कोरडे करून नंतर येथे हे तेल लावले तर पायाच्या चिखल्या बऱ्या होतात.

३) खोबरेल तेल व हळद: हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. म्हणूनच आपण हळदीचा स्वयंपाकात समावेश करतो. खोबरेल तेल व हळद कोमट करून जर चिखल्या उठलेल्या जागी लावले तर पायांना लगेच आराम मिळतो आणि जखम बरी होण्यास मदत होते.

४) पावसाळ्यात गम गुड चा वापर करणे: पावसाळ्यात पाय भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. यासाठी तुम्ही गम बूट वापर करू शकता. किंवा पाणी पायात शिरणार नाहीत असे पाणी अवरोधक बूट वापरावेत.

५) सुती पायमोजे वापरा: पावसाळ्यात मोजे वापरताना नेहमी सुती पाय मोजांचा वापर करावा. नायलॉनचे पाय मोजे वापरण्याचे टाळावे. ओले पाय मोजे वापरू नका. एक्स्ट्रा चे जोड सोबत ठेवा.

६) औषधी पावडर/क्रीम चा वापर करावा: डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही काही औषधी क्रीम आणि पावडर यांचा उपयोग करून पायांच्या चिखल्या बऱ्या करू शकता.

७) कापूर आणि हळद: कापूर आणि हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. कापूर बारीक करून त्यामध्ये हळद मिक्स करून ही पूड शूज व मोजे घालण्याआधी पायाला लावल्यास पाय ड्राय राहतात आणि दुर्गंधी येत नाही त्यामुळे चिखल्या उठत नाहीत.

            वरील लेखात सांगितलेले हे उपाय कसे वाटले आणि या माहितीमध्ये काही बदल सांगायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद!

टिप्पण्या